जळगाव : प्रतिनिधी
जगातील चीन पाठोपाठ भारतात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. राज्याकडून उपाययोजना करण्याबाबत सूचना प्राप्त होताच रविवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बैठक घेऊन आरोग्य विभागाला तपासण्या व लसीकरण वाढवण्याच्या सूचना दिल्या. त्यात रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी देखील तपासण्या सुरु करण्याबाबत महापालिकेला सूचना दिल्या.
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, जिल्हा परिषदेचे डी. बी. पांढरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. सुपे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका, जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचा आढावा घेतला. हेल्थ पोस्ट शिवाय बसस्थानक व रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या करण्याबाबत सूचना या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शहरात कुठे तपासणीची सुविधा सुरु करता येईल याचे नियाेजन हाेईल. मात्र, संदर्भात सहाय्यक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका अधिकाऱ्यांची बैठक हाेईल. यानंतर केंद्र सुरु करण्यात येईल अशी माहिती डॉ. राम रावलानी यांनी दिली.