Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कडाक्याच्या थंडीने होणार नववर्षाचे स्वागत
    आरोग्य

    कडाक्याच्या थंडीने होणार नववर्षाचे स्वागत

    editor deskBy editor deskDecember 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    देशात मोठ्या प्रमाणात गेल्या आठ दिवसापासून थंडी सुरु असतांना आता नवीन अंदाजानुसार नववर्षाचे स्वागत करण्यासाठी थंडी आता सज्ज झाली असून ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या पाच दिवसांत हंगामातील सर्वात कडाक्याची थंडी पडू शकते. पंजाब, हरियाणासह काही राज्यांत रात्रीचे तापमान नीचांकी होऊ शकते.

    दिल्ली, राजस्थान, पश्चिम-उत्तर प्रदेशात रात्रीचे तापमान १ ते ४ अंशांदरम्यान राहू शकते. कमाल तापमान १० ते १४ अंश सेल्सियस राहू शकते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्तरेकडील डोंगराळ राज्यांपासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व आणि उत्तर मध्य प्रदेशातील बहुतांश भागात दाट धुके पाहायला मिळेल.

    दक्षिणेकडील राज्ये वगळता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात देशभरात तापमानात घट नोंदवली जाईल. हवामान विभागानुसार २७ ते ३० डिसेंबरदरम्यान दिवस-रात्रीच्या तापमानात किरकोळ वाढ होईल. वाऱ्यातही बदल जाणवेल. आतापर्यंत नैऋत्य मोसमी वारे डोंगरातून बर्फाळ वारे घेऊन वाहत आहेत. २७ पासून हवामानातील अस्थैर्यामुळे वाऱ्यात असे बदल दिसतील. त्यामुळे दिवसाचे तसेच रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ञ नवदीप दहिया म्हणाले, २९ ते ३० डिसेंबरला जम्मू-काश्मीर तसेच हिमाचल प्रदेशात पश्चिमी विक्षोभामुळे बर्फवृष्टीची शक्यता आहे. त्यानंतर हवेचा पॅटर्न बदलेल. त्यामुळे मैदानी प्रदेशातील थंडीचा कडाका वाढेल. हा हंगामातील सर्वात थंड काळ असेल. हवामान विभागानुसार भूमध्यसागरातील पश्चिमी विक्षोभ हिमालयीन भागात सक्रिय होईल. २९ डिसेंबरनंतर डोंगरी राज्यांत बर्फवृष्टी होईल. काही ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    हळद, मेहंदी आणि कोरफड: नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा सोपा फॉर्म्युला

    January 20, 2026

    वजन कमी करायचंय? दररोज एक बाजरीची भाकरी पुरेशी!

    December 10, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.