जळगाव प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त भा ज पा जिल्हा व महानगर पालिका तर्फे सेवा समर्पण ,अभियानात अंतर्गत भव्य कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम लसीकरणाचा कार्यक्रम अंतर्गत पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात आला .2271 नागरिकांनी घेतली कोरोना लस
घेतली .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त भा ज पा जिल्हा व महानगर पालिका तर्फे सेवा समर्पण ,अभियानात अंतर्गत भव्य कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम आज १७ रोजी सरदार वल्लभाई पटेल सभागृह टेलीफोन ऑफिस मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट जवळ येथे सकाळी ९ वाजता झाला. यावेळी भारत मातेच्या प्रतिमा पुजन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे (राजु मामा) यांच्या व जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, म न पा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी केले .
या प्रसंगी गट नेते भगत भाई बालाणी प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष उज्वलाताई बेडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी डॉ राधेश्याम चौधरी महेश जोशीं नितीन इंगळे विधानसभा क्षेत्र प्र दीपक साखरे सेवा अभियान प्रमुख राहुल वाघ,महेश चौधरी ,वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ नरेंद्र ठाकूर, डॉ धर्मेंद्र पाटील व पदाधिकारी उपस्थित होते
या प्रसंगी आ सुरेश भोळे यांनी सांगितले कि देशांचे लोकप्रिय पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त आजचा हा विशेष कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम आम्ही सर्व सामान्य जनते साठी आयोजित केला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला हि लस दिली केली पाहिजे . आज पासुन भा ज पा तर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर प्रयन्त सेवा समर्पण अभियानं भा ज पा जळगाव जिल्हा व महानगर तर्फे राबविण्यात येणार आहे .यात , कोरोना योद्धा चा सन्मान, रक्त दान शिबिर अ असंटीत कामगार नोंदणी, गरीब बांधवांना धान्य वाटप से कार्यक्रमघेण्यात येणार आहे असे त्यानी सांगितले.