जळगाव : प्रतिनिधी
नवनिर्वाचित सरपंच व सदस्य हे आता गावाचे कारभारी आहेत. आपले अधिकार, कर्तव्ये, ग्रामपंचायतीचे दप्तर समजल्यास चांगले काम करता येईल. त्यासाठी नवीन सरपंचांनी ‘सरपंचकी’ समजून घ्यावी.. सरपंचाने गावाचा अभ्यास करावा ; नियमांची माहिती जाणून घेण्याची गरज आहे. आता निवडणूक संपली असल्याने नवीन सरपंच व सदस्यांनी गावाची एकजूट कायम ठेवून एकोप्याने “गावाचा विकास ” साध्य करा. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच विकासाचा केंद्रबिंदू आहे. हा सत्कार एकट्या सरपंचांचा नसून संपूर्ण गावाचा सत्कार आहे. आपल्या गावात मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण करून १००% यशस्वी करा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आज दिवसभरात १५ पेक्षा जास्त सरपंच व ७५ च्यावर ग्रा.पं. सदस्यांनी पालकमंत्री यांची भेट घेऊन या सर्वांचा सत्कार ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा पाळधी येथिल विश्रामगृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, तालुका प्रमुख व निराधार समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, जळगाव तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, जनाआप्पा पाटील, रमेशआप्पा पाटील, रवी कापडणे, मंगलअण्णा पाटील, दामुअण्णा पाटील, नारायण आप्पा सोनवणे, शिवाजी पाटील, ग. स. चे माजी सभापती मनोज पाटील, गोपालजिभाऊ पाटील, नगरसेवक मनोज चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी , किशोर मराठे, गजानन बापू, अहमद पठाण, शांताराम महाराज, पुंडलिक पाटील, विकास पाटील, बाजीराव पाटील, कमलेश बोरसे, वसीम पिंजारी, तुकाराम पाटील , गोकुळनाना पाटील, हेमंत चौधरी, सोपान बोरसे, अनिल पाटील, प्रकाशनाना पाटील, किशोर पाटील, समाधान चिंचोरे, विजय आमले, संजय पाटील, सोपान पाटील, बाळू अहिरे, भागवत नन्नवरे, सुलतान पठाण, विजूबापू पाटील, प्रशांत झव्वर, समाधान वाघ, मच्छिंद्र कोळी व आबा माळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले. तर आभार जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले.
सरपंच , तुम्ही भाग्यवान आहात
यावेळी पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून तुमच्या हातून गावाची तहान भागवता येणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप भाग्यवान आहात. ‘पिण्याचे पाणी, पथदिवे, स्वच्छता व शिक्षण या सुविधा तसेच सरकारी योजना गरजूंना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून गावाची एकजूट ठेवा असे आवाहन केले आहे.
जळगाव व धरणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. १९ पैकी २ ग्राम पंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे मंगळवारी १७ ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील १२ पैकी १० तर धरणगाव तालुक्यातील ७ अशा ६ अश्या १९ पैकी १६ ग्राम पंचायतीमधील जनतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवत, १९ ग्रामपंचायतीच्या सरपंचासोबतच निवडणुकीत धरणगाव तालुक्यातील ५१ ग्रामपंचायत सदस्यांपैकी तब्बल ४२ ग्रां.पं. सदस्य तर जळगाव तालुक्यातील ९२ पैकी ८३ ग्रा. पं. सदस्य असे एकूण १४३ ग्रा.पं, सदस्यांपैकी तब्बल ७५ च्यावर सदस्यांनी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दिवसभरात आज भेट घेतली . जळगाव ग्रामीणमधील जनतेने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर विश्वास दाखवत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण भागात शेतरस्ते, शिवरस्ते, ग्रामीण भागातील रस्त्यांची केलेली विविध विकास कामे, विविध गावांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना, गावातील अंतर्गत रस्ते या कामांच्या जोरावर जनता ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबतच असल्याचे सिध्द करून दाखवले आहे.
जळगाव व धरणगाव तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा झाला सत्कार !
जळगाव तालुक्यातील अनिताबाई नितीन जाधव (वराड खुर्द), कैलास सोनू जळके (विदगाव), संदीप मच्छिंद्र चौधरी (किनोद), सतीश रघुनाथ पाटील (कुवारखेडा), नितीन सुरेश कोळी (भोलाणे), निकिता मोतीलाल सोनवणे (देऊळवाडे), कल्पना लीलाधर पाटील (घार्डी-आमोदे), सुनंदा सुनील सोनवणे (सुजदे-बिनविरोध ), ज्योती जितेंद्र पाटील (सावखेडा खुर्द-बिनविरोध ) भादली खुर्दयेथील सरपंच व सदस्यांचा तसेच धरणगाव तालुक्यातील अनिल महारु पाटील (कल्याणे होळ), मिलिंद भास्कर बोरसे (धार – बिनविरोध ), कविता काशिनाथ पाटील (खर्दे) , गोरख श्रीराम पाटील (वाघाळूद खु.) , दगडू लहू पाथरवट (भामर्डी), व अर्चना दिनकर पाटील (बोरगाव खु.) येथे भगवा फडकला असून दरम्यान, आज या सर्व सरपंचांचा व आज दिवसभरात उपस्थित ७५ पेक्षा जास्त जास्त निवडून आलेल्या ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व बाळासाहेब शिवसेनेंचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.