जळगाव : प्रतिनिधी
नशिराबाद हे बाजारपेठेचे व व लोकवस्तीचे मोठे शहर असून बेरोजगारांच्या गरजा लक्षात घेता नशिराबाद – उमाळा परिसरात मोठा प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. ते पुढे म्हणाले की, नशिराबादच्या विकासासाठी आपण भरीव निधी दिला असून यातील नगर विकास व डीपीडीसी मधून १० कोटींची कामे सुरु आहेत. CRF व बजेट अंतर्गत नशिराबाद ते सुनसगाव या ५ किमीच्या रस्त्यासाठी १५ कोटी निधी मंजूर आहे. यात गावाजवळील भातातील दोन्ही बाजूला कॉन्क्रीट गटारी व काँक्रीट रस्ता होणार आहे. नशिराबाद हे शहर हायवेला टच असून आता मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. यामुळे येथे वैद्यकीय सुविधा देखील वाढीव अशी लागणार असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून येथे ट्रॉमा सेंटरसह उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. नशिराबाद वासियांना सुविधा देण्यासाठी आपण कटीबध्द असून येत्या काळात नशिराबादचा कायापालट झालेले आपल्यास दिसेल अशी ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे होते.
पालकमंत्र्यांनी मागणी करताच निधी दिला – लालचंद पाटील
नशिराबाद येथील गरज लक्षात घेऊन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असावे अशी मागणी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व माजी जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. यावर ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने प्रा आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ठोक ६ कोटी रूपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम शक्य झाले असे जि. प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले. १ वर्षापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन झाले होते. आणि आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले हे विशेष. मुदतीत व दर्जेदार बांधकाम केल्याबद्दल दोन्ही मंत्री महोदयांनी कौतुक केले. या वेळी कोविड काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्य सेविंका, आरोग्य सेवक, आशा वर्कर , अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच कर्मचाऱ्याचा सत्कार पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हा मोती बिंदू मुक्त करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
राज्याचे ग्राम विकास मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी अध्यक्षीय स्थानावरून बोलताना सांगितले की, नशिराबादला प्रा.आ.केंद्राची दर्जेदार व सुंदर वास्तू उभारल्याबद्दल पालक मंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष कौतुक केले. तरुणांनी नियमित व्यायाम करून व्यसना पासून दूर राहावे , नशिराबाद येथील विद्यार्थी व तरुणांसाठी आधुनिक जिम उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली . आरोग्य सेवेसाठी सर्वतोपरी मदत करणार असून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा मोतीबिंदू करणार असल्याचा संकल्प देखिल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला ते नशिराबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जि.प. सदस्य प्रभाकरआप्पा सोनवणे , माजी सरपंच विकास पाटील, माजी उपसरपंच किर्तिकांत चौबे,बाळासाहेब सेनेचे शहरप्रमुख विकास धनगर, युवासेनेचे चेतन बर्हाटे, भाजपा तालुका अध्यक्ष गोपाळ भंगाळे, भाजपा युवा मोर्च्याचे किरण पाटील, माजी शिक्षण व आरोग्य सभापती कमलाकर रोटे , भादली सरपंच मिलिंद चौधरी, प.स.सदस्य हर्शल चौधरी, जि.प.चे उप अभियंता एस.आर. वंजारी, शाखा अभियंता रमाकांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय चव्हाण, नशिराबाद वैद्यकीय अधिकारी ईरेश पाटील, डॉ. शहा, भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, मार्केटचे मनोहर पाटील, धरणगावचे पी.एम. पाटील सर, गोकुळनाना पाटील, वि.का. सोसायटीचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत भोळे, चेअरमन मनोज रोटे, कैलास नेरकर, नितीन बेंडवाल करीम कल्ले, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सुवर्ण महाजन, वैशाली पाटील, कविता महाजन ,जोत्स्ना पाचपांडे, सुवर्णा महाजन, आदी मान्यवरांसह परिसरातील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी सविस्तर माहिती विषद केली. सूत्र संचालन राजेंद्र पाचपांडे सर यांनी केले तर आभार जि. प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी मानले.