पुणे : वृत्तसंस्था
सोशल मिडिया व चित्रपटातून कितीपत लोक योग्य कला घेतील हे सांगता येत नाही. दृश्यम चित्रपट पाहून दोन मुलांनी चक्क आपल्या बापालाच संपविल्याचा प्रताप उघड झाला आहे. पुण्यातील 2 भावांनी आपल्याच वडिलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची जाळून विल्हेवाट लावली. या दोघांनी वडिलांना ठार मारण्याचा प्लॅन दृश्यम चित्रपट पाहून तयार केला. हत्येनंतर स्नॅक्स तयार करण्याच्या घरच्या भट्टीत त्यांनी वडिलांचा मृतदेह जाळला. या खळबळजनक घटनेनंतर 8 दिवसांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.
धनंजय नवनाथ बनसोडे असे मृताचे नाव आहे. ते आपल्या फूड कॉर्नरवर फरसान विकत होते. त्यांचा 22 वर्षीय मोठा मुलगा सुजीत कंप्यूटर इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत आहे. तर 18 वर्षीय दुसरा मुलगा अभिजीत इयत्ता 12वीत शकतो. या दोघांनी 15 डिसेंबर रोजी रात्री वडिलांची हत्या केली. त्यावेळी धनंजय झोपेत होते. महाळुंगे पोलिस ठाण्याचे प्रभारी किशोर पाटील यांनी सांगितले की, 43 वर्षीय धनंजय यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरच्या एका महिलेशी विवाहबाह्य संबंध जुळले होते. याविषयी त्याचे दररोज पत्नी व 2 मुलांशी भांडण होत होते. दुसरीकडे, आरोपी मुलांच्या मते, ती महिला आपल्या वडिलांवर अनैतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या मुद्यावर ठाम होती. त्यामुळे आम्ही दोन्ही भावांनी मिळून वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांच्या माहितीनुसार, वडिलांची हत्या केल्यानंतर दोन्ही भावांनी त्यांचा मृतदेह स्नॅक्स तयार करण्याच्या भट्टीत जाळला. त्यानंतर त्याची राख व हाडे इंद्रायणी नदीच्या काठावर नेवून टाकली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या दोघांनी 19 डिसेंबर रोजी महाळुंगे पोलिस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रारही दाखल केली. हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यात धनंजयने मागील 3 वर्षांत नागपूरच्या महिलेला अनेकदा कॉल केल्याचे आढळले. चौकशी केल्यानंतर महिलेने सांगितले की, धनंजयने आपल्यातील अनैतिक संबंधांमुळे कुटुंबीयांकडून जिवाला धोका असल्याचे सांगितले होते. धनंजयने सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातूनही महिलेला आपल्या जिवितास धोका असल्याचे सांगितले होते. त्यांनी पोलिसांनी आरोपी भावांना भादंवि कलम 302 (हत्या), 201 (पुरावे नष्ट करणे व चुकीची माहिती देणे) व 34 (समान हेतूने काम करणे) अंतर्गत अटक केली. सध्या ते दोघेही पोलिस कोठडीत आहेत.