चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन जणांचे घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी मेहुनबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिरसगाव येथील विजय केशवराव चव्हाण यांच्या घरातील व त्यांच्या समोर राहत असलेले नंदलाल नामदेव शेवाळे यांच्या घरातून अनोळखी चोरट्यांनी पाच लाख 40 हजार रुपयांचा दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. यामध्ये वीस हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजनाच्या दहा अंगठ्या , नऊ हजार रुपये किमतीचा सोन्याचा शिक्का, एक हजार रुपये किमतीचे चांदीचे देव, दहा हजार रुपये किमतीच्या साड्या, नंदलाल शेवाळे यांच्या घरातील पाच लाख रुपये रोकड असा येऊन लंपास केला आहे. याप्रकरणी विजय केशवराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मेहुनबारे परिसर पोलिसात अनोळखी चोरट्याने विरोधात घरपोडीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणी पुढील तपास सपोनी विष्णू आव्हाड हे करीत आहेत.