Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई ; एक कोटींचा माल हस्तगत !
    अमळनेर

    मोठी बातमी : बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई ; एक कोटींचा माल हस्तगत !

    editor deskBy editor deskDecember 25, 2022No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी 

    ३१ डिसेंबर काही दिवसावर येवून ठेपली आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मद्यप्रेमी मद्य पचवीत निरोप देत असतात यामध्ये दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मद्य विकले जाते, त्या अनुशगाने हि कारवाई केली गेल्याचे बोलले जात आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सत्यनारायण मंदिरासमोर एका गोदामात बनावट देशी दारूचा कारखाना गुप्त माहितीवरून नाशिक दारूबंदी उपायुक्त यांनी छापा टाकून लाखो रुपयाची दारूसह तीन ट्रक, कच्च्या माल यासह 22 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पारोळा शहरासह तालुक्यात एकच खळबळ माजली असून बनावट दारू बनवण्यात पारोळा तालुका हा अग्रेसर असून यापूर्वीही असे अनेक कारखाने दारूबंदी विभागाने उघड केले आहेत. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने केली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, दि. २४ डिसेंबर रोजी मौजे पारोळा नगरपरिषद हद्यीतील धुळे- नागपुर महामार्गालगत असलेल्या गट नं. १८१ मधील प्लॉट नं.१,२ व ३ या मिळकतीमध्ये असलेल्या पत्र्याच्या गोडावूनमध्ये पारोळा शिवार, पारोळा, ता. पारोळा, जि.जळगाव या ठिकाणी छापा टाकुन बनावट मद्य तयार करणारा कारखाना उध्दवस्त केला.

    दीड कोटींचे साहित्य जप्त
    १) रॉकेट देशी दारु संत्रा ब्रँडचे ३७,२०० बनावट जिवंत पत्री बुचे,
    २) देशी दारु दारु टँगो पंचचे ४००० बनावट जिवंत पत्री बुचे
    ३) रॉकेट देशी दारु संत्रा ब्रँडचे १,५५,५०० बनावट कागदी लेबल,
    ४) देशी दारु दारु टँगो पंचचे ६०,००० बनावट कागदी लेबल.
    ५) एक आर. ओ मशीन.
    ६) ९० मि.ली क्षमतेच्या २४, २२० रिकाम्या बाटल्या.
    ८०० लिटर Acetone सदृष्य द्रावण.
    ८) रबरी नळी, पाण्याचे माटर, २०० लिटर क्षमतेच्या २४ प्लास्टिक ड्रम स्पिरीट वासाचे,
    ३५० फुट लांबीची वायर,
    ९) प्लास्टिक ट्रे- १०० नग
    १०) नऊ मोबाईल संच
    तसेच
    १) एक दहा चाकी टाटा कंपनीचा ट्रक परिवहन क्र. MH १८ – M – ३८३७.
    २) एक सहा चाकी आयशर कंपनीचा ट्रक परिवहन क्र. MH १८-BG-९८२३.
    असा एकूण १ कोटी ६४ लाख १६२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    २२ जणांवर गुन्हा दाखल
    १) महेश संभाजी पाटील, राहणार- जवखेडे, ता. अमळनेर, जि. जळगाव, २) सुदामगिर भुरागिर गोसावी, राहणार- भाटपुरा ता. शिरपुर, जि. धुळे, ३) प्रेमसिंग रतन जाधव, राहणार – रोहिणी ता. शिरपुर, जि.धुळे ४) नरेंद्र मधुकर पाटील, मु. पो. गुढे, ता. भडगांव, जि. जळगांव, ५) राजु रतन जाधव, राहणार- मु.पो. धवली, ता. वरला, जि. बडवानी (मध्यप्रदेश), ६) प्रदिप ईस्मल पावरा, राहणार- मु. मोहिदा, पो. पळसनेर, ता. शिरपुर, जि.धुळे,७) दिपक गुलाब पावरा, राहणार- मु. दुधखेडा ता. वरला, जि. बडवानी (मध्यप्रदेश),८) रंजीत निंबा पावरा, राहणार- मु. गधाडदेव, पो. मालकात्तर ता. शिरपुर, जि. धुळे, ९) प्रताप चंदरसिंग पावरा, राहणार- मोहिदा, पो. पळसनेर ता. शिरपुर, जि. धुळे, १०) सतिष अबला पावरा, राहणार- मोहिदा, पो. पळसनेर ता. शिरपुर, जि. धुळे, ११) प्रकाश बदा पावरा, राहणार- मोहिदा, पो. पळसनेर ता. शिरपुर, जि. धुळे १२) राकेश कंदरसिंग पावरा, राहणार- मोहिदा, पो. पळसनेर ता. शिरपुर, जि. धुळे, १३) दयाराम नहालसिंग बारेला, राहणार- मु. धवर्ला, ता. वरला, जि. बडवानी (मध्यप्रदेश),१४) रामगिर भुरागिर गोसावी, राहणार- भाटपुरा ता. शिरपुर, जि.धुळे १५) भिमसिंग बदा चव्हाण, राहणार- मु. तांडा, पो. धवर्ला, ता. वरला, जि. बडवानी (मध्यप्रदेश),१६) सुरेश श्रावण राठोड, राहणार- रोहिणी ता. शिरपुर, जि. धुळे, १७) निलेश नुरजी पावरा, राहणार- मोहिदा, पो. पळसनेर ता. शिरपुर, जि. धुळे, १८) समाधान लोचन चौधरी (मुख्य संशयीत फरार), राहणार-पारोळा, ता. पारोळा जि. जळगांव,१९) सुधाकर भास्कर पाटील (संशयीत फरार), राहणार – वर्धमान नगर, उंदीरखेडारोडा, ता. पारोळा, जि. जळगाव,२०) प्रदिप आनंदा पवार ( संशयीत फरार), राहणार- आर.एल. नगर, अमळनेर रोड, ता. पारोळा, जि. जळगाव, २१) राहुल अहिरराव, (संशयीत फरार), राहणार – मु. पो. धुळे, ता. जि. धुळे., २२) संशयित पाहिजे गुन्ह्यात जप्त वाहन क्र. MH-18-M-3837 व MH-18- BG-9823 चे मालक तसेच मद्य विकत घेणार, मद्यार्क (स्पिरीट) पुरवठादार ज्ञात-अज्ञात व गुन्ह्याशी संबधीत इतर संशयीत फरार इसम

    यांनी केली कारवाई

    सदरची कारवाई डॉ. विजय सुर्यवंशी (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई), सुनिल चव्हाण, संचालक (अं. व द) महाराष्ट्र राज्य, मुंबई, अर्जुन ओहोळ (विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग)तसेच जितेंद्र गोगावले (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. पाटील, अ. गो. सराफ, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर, यांनी यशस्वी रित्या पार पाडली. सदरील कारवाई करिता निरीक्षक, भरारी पथक, जळगाव, सी. एच. पाटील व त्यांचा स्टाफ तसेच निरीक्षक, भरारी पथक, धुळे श्री. दिंडकर व त्यांचा स्टाफ तसेच दुय्यम निरीक्षक, धुळे ग्रामीण, धुळे पी. बी. अहिरराव व त्यांचा स्टाफ यांनी मदत केली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास ए. एस. चव्हाण, निरीक्षक, विभागीय भरारी पथक नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026

    मुंब्रा विजय भाषणातील वक्तव्यावरून वाद; सहार शेख यांचा खुलासा व माफी

    January 24, 2026

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.