जळगाव : प्रतिनिधी
३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मोठ मोठ्या पार्टीच्या अनुषंगाने राज्यातील विविध ठिकाणी आता बनावट दारू विक्री करणारे व दारू तयार करणारे यांच्यावर राज्य उत्पादन विभागाचे बारीक लक्ष असून आता जिल्ह्यात नाशिक विभागाच्या राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यानी मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.
मिळालेली माहिती अशी कि, पारोळा शहरातील धुळे रस्त्यावर नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एका ठिकाणी सुरु असलेले बनावट देशी दारूच्या १ हजार पेट्या जप्त केल्या असून याबाबत पुढील कार्यवाही सुरु असल्याचे वृत्त आहे. जळगाव जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यानी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.
या बातमीबाबतचे सविस्तर वृत्त हाती येताच पुढील बातमी अपडेट व अधिकाऱ्याची प्रतिक्रिया घेण्यात येईल.