Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अभिनेत्री टुनिशा शर्माने सेटवरच घेतला गळफास !
    क्राईम

    अभिनेत्री टुनिशा शर्माने सेटवरच घेतला गळफास !

    editor deskBy editor deskDecember 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली 20 वर्षीय टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माने मालिकेच्या सेटवरच आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिने एवढं टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

    Maharashtra | TV actress Tunisha Sharma committed suicide by hanging herself on the set of a TV serial. She was taken to a hospital where she was declared brought dead: Waliv Police

    — ANI (@ANI) December 24, 2022

    मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, टुनिशाने शोच्या सेटवरच हे पाऊल उचलले. तिने शोच्या मुख्य अभिनेत्याच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिचा फासावर लटकलेला मृतदेह कोणीतरी पाहिल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. टुनिशाने एवढं मोठं पाऊल उचलण्यामागचं कारण काय असेल, याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र सेटवर असे पाऊल उचलल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. टुनिशा अवघी 20 वर्षांची होती आणि इतक्या लहान वयात तिला लोकप्रिय शोमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. यामुळेच हा काळही तिच्यासाठी खूप चांगला होता. मालिकेच्या माध्यमातून ती घरोघरी पोहोचली होती. एवढ्या उमद्या अभिनेत्रीने उमेदीच्या काळातच केलेल्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.