• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणासाठी महत्वाची बातमी : या दिवशी होणार पोलीस भरतीची मैदानी चाचणी !

editor desk by editor desk
December 24, 2022
in राज्य, राष्ट्रीय, शैक्षणिक, सामाजिक
0
तरुणासाठी महत्वाची बातमी : या दिवशी होणार पोलीस भरतीची मैदानी चाचणी !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यात गेल्या काही महिन्यापासून पोलीस भरतीसाठी तरूण सराव करीत होते. नुकतीच त्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले असून आता पोलिस भरतीच्या मैदानी परीक्षेचे वेळापत्रक शहर पोलिस आयुक्तालयाकडून अंतिम झाले आहे. चालक पदाची पहिल्यांदा आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी मैदानी चाचणी होईल. २ ते २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी उरकली जाणार आहे. ग्रामीण पोलिस दलाची मैदानी चाचणी देखील २ जानेवारीपासूनच सुरु होणार आहे.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे चालकपदाच्या ७३ जागांसाठी पाच हजार ५५८ उमेदवारांचे अर्ज आहेत. तर शिपाई पदाच्या ९८ जागांसाठी सहा हजार ६२१ उमेदवार मैदानात आहेत. चालकसाठी २५२ महिला तर शिपाई पदासाठी एक हजार ३८५ महिला उमेदवार आहेत. आयुक्तालयाच्या मैदानावरच उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडेल. २ जानेवारीपासून मैदानीला सुरवात होणार असून पहिल्या दिवशी ६०० उमेदवारांना बोलावले जाणार आहे. त्यानंतर दररोज ९०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आयुक्तालयाने केले आहे. चालकपदाच्या उमेदवारांची मैदानी झाल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्यांना बोलावले जाणार आहे. २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी झाल्यानंतर फेब्रुवारीत लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे. मुंबई वगळता राज्यभरात पोलिस शिपाई व चालक पदांसाठी एकदाच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने मैदानी चाचणी पार पडणार असून त्यात कमीतकमी मानवी हस्तक्षेप राहणार आहे. भरतीच्या प्रत्येक क्षणाचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार असून भरती काळात मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्यांदाच पोलिस भरतीत तृतीपंथीयांना संधी मिळाली आहे. त्यांची मैदानी चाचणी कशी होणार, त्यात धावणे, गोळाफेक पुरुषांप्रमाणे की महिलांप्रमाणे होणार की त्यांचे स्वतंत्र नियोजन होणार हे अजूनही निश्चित झालेले नाही. आगामी काही दिवसात ते ठरणार आहे. दरम्यान, सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस भरतीत फक्त एकाच तृतीयपंथी उमेदवाराने पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केला आहे.

Previous Post

माजी आ.जैन यांना न्युमोनियाची लागण ; मुंबईत उपचारासाठी दाखल !

Next Post

पत्नी व प्रियकराने पतीला दिला त्रास त्याने उचलले टोकाचे पाऊल !

Next Post
पत्नी व प्रियकराने पतीला दिला त्रास त्याने उचलले टोकाचे पाऊल !

पत्नी व प्रियकराने पतीला दिला त्रास त्याने उचलले टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group