धरणगाव (प्रतिनिधी ) ;- धरणगावात शिवसंपर्क अभियानांतर्गत गाव तिथे शाखा, गाव तिथे बोर्ड, गाव तिथे शिवसैनिक शिवसंपर्क अभियानातून याला गती मिळाली आहे. आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव चालक-मालक संघटना (मालवाहतूक) शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना सागितले कि चालक मालक संघटनेचा कोणत्याही अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शिवसेना आपल्या पाठीशी भक्कम पणे उभी आहे. असे ठाम पणे सागितले.
यावेळी धरणगांव जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांच्या वाढदिवसा निमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील याचा हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष प्रतिक जैन तसेच समाजाचे राजकुमार जैन, अंपग सेनेचे अक्षय मुथा उपस्थित होते.
यावेळी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विलास महाजन , विजय महाजन, भागवत चौधरी, किरण मराठे, धीरेंद्र पुरभे , बाळू जाधव, सतीश बोरसे, मोतीपाटील, इ मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला . चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गणेश बडगुजर, उपाध्यक्ष दिलीप बदाम महाजन, सचिव संजय भावसार, खजिनदार संदीप मराठे, अण्णा महाजन, भास्कर महाजन, दीपक पाटील, कमलेश बडगुजर, गोपाल माळी, पिंटू बडगुजर, गणेश महाजन, दीपक महाजन, पांडुरंग महाजन, राहुल पाटील, पिंटू दरबार, रवींद्र माळी, बुधा मराठे, नामदेव मराठे , सुरेश महाजन, रवी महाजन , निलेश महाजन, मनोज चौधरी, प्रवीण भोई , नरेश चौधरी, राकेश महाजन, परशुराम महाजन, रतन महाजन, मयंक पटेल, राहुल चौधरी, जितेंद्र चौधरी, गणेश कासार, सतीश महाजन, निंबा चौधरी, पिंटू महाजन, नाना महाजन, योगेश महाजन, राजू महाजन, बापू महाजन, नामदेव महाजन, सुरेश महाजन, विजय अहिरे, एकनाथ महाजन, राकेश मराठे , विजय बिचवे, किशोर माळी, प्रविण गुरव, संतोष महाजन, राजेंद्र चौधरी, छोटू बोरसे, सोनू चौधरी इत्यादी कार्यक्रमाचा यशस्वी साठी यांनी परिश्रम घेतले . सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी तर आभार सतीश बोरसे यांनी मानले.