नागपूर : वृत्तसंस्था
राज्याचे हिवाळी अधिवेशनात कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. ते दोन्ही सभागृहातील कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत. विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेत्यांनीच भुखंड घोटाळाप्रकरणी ‘आयएल’ दाखल केली होती. त्यांनीच एकनाथ शिंदेंचा भुखंड घोटाळा पुढे आणला, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन करणार आहे. याचे पडसाद विधानभवनात देखील उमटणार असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार घालतला आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे.
राज्यविधिमंडळ अधिवेशनाने राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फडणीस पुणे येथे आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना अचानक दिल्लीहून निरोप आल्याचे समजते. त्यांनी मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ते तातडीने पुण्याहूनच दिल्लीला रवाना झाले. फडणवीस यांना दिल्लीहून कशासाठी बोलावणे आले, याची चर्चा सुरू झालीय. दिशा सालियानप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. पटोले म्हणाले, फडणवीस यांनी दिशा सालियानप्रकरणी चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्यावर सोमवारी हक्कभं प्रस्ताव आणण्यात येणार आहे.