मुंबई : वृत्तसंस्था
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून आग लावण्याचे काम सुरू आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर त्यांनी आम्हाला भाषा, संस्कृती शिकवू नये असे म्हणताना संजय राऊत म्हणाले शिंदे-फडणवीसांच्या चुप्पीमुळे बोम्मई हे जास्त बोलताय असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानभवनात खोके सरकारचे मंत्री, आमदार हे केवळ व्ययक्तिक विषयावर बोलत होते. मात्र कर्नाटक सरकारने काल महाराष्ट्राबाबत जो निषेध ठराव मंजूर केला, यांची माहिती नसावी हे यांचे महाराष्ट्र प्रेम का असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे कर्नाटक सरकारने एक इंचही जागा देणार नाही असे सांगितले मात्र आम्ही एक इंच जागा मागतच नाही, आम्हाला कर्नाटकची जमीन नको, आम्हाला वाद नको आहे. मात्र आमचे बेळगाव, कारवासह 856 गावे आहेत त्यांच्यावर आमचा दावा आहे. तो आमच्या कायदेशीर दावा आहे बोम्मईसारखा फायदेशीर दावा आहे. बोम्मईंकडून राजकीय फायद्यासाठी अचानक हा वाद निर्माण करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की,आम्ही चीनचे एजंट असू तर तुम्ही कुणाचे एजंट अहात? असा सवालच संजय राऊत यांनी बोम्मईंना विचारला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या अमित शहांचा आदेश बोम्मई पाठत नाही का असा प्रश्नही यावेळी संजय राऊत् यांनी विचारला आहे. तर विधानसभेत सोमवारी कर्नाटक, बोम्मईंविरोधात निषेध ठराव मांडायला हवा, असे म्हणताना बोम्मईवर गुन्हा दाखल करायला हवी अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे. उद्या राज्य सरकार हे बोम्मईंना क्लीनचिट देईल असा आरोपही संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, राज्य सरकारमध्ये दुबळे मुख्यमंत्री आणि दुबळे गृहमंत्री असल्याने कर्नाटककडून अशा भाषेचा उपयोग केला जात आहे. आमची ईच्छा बरेच काही करण्याची आहे,आमची भाषा घुसण्याची आहे, पण सरकारमध्ये हिंमत आहे का? सरकारला इतक्या शेपट्या आहेत की ते रोज एक शेपटी आत घालताय असे म्हणत राज्य सरकारवर घणाघात केला आहे. इतर विषयांवर शेपटी घाला पण 20 लाख मराठी बांधवांच्या बाबतीत तरी इमान राखावे असेही संजय राऊत् यांनी म्हटले आहे.