Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज ठाकरेंचा नागपुर दौरा ; चर्चेला उधान !
    राजकारण

    राज ठाकरेंचा नागपुर दौरा ; चर्चेला उधान !

    editor deskBy editor deskDecember 23, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था 

    राज्यात हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. त्यासाठी राज्यातील मंत्र्यासह नेते या अधिवेशनात येत आहे. तर राजकीय पक्षाचे मंडळीदेखील अधिवेशन परिसरात येवून आपली उपस्थिती लावत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने ते स्थानिक नेत्यांसोबत भेट घेत चर्चा करणार आहेत. यासोबतच हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज ठाकरे नागपुरात जात असल्याने सर्वाचे लक्ष त्यांच्या या दौऱ्याकडे लागले आहे. नागपूर दौऱ्यात राज ठाकरे कुणाची भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये राज ठाकरेंचा हा दुसरा नागपूर दौरा आहे. मागील वेळी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपच्या विरोधात लढणार असे म्हणताना भाजपवर निशाणा साधला होता. या दौऱ्यात मनसे प्रमुखांच्या हस्ते नवीन शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्राचे वाटप होणार आहे. तर स्थानिक समस्या काय आहेत हे जाणून घेत त्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना कराव्या यासंदर्भात चर्चा ही होणार आहे. 3 महिन्यापूर्वी राज ठाकरेंनी नागपुरात राज्यातल्या अस्थिर राजकीय परिस्थितीला संधी म्हणून बघा, अशी सूचना मनसैनिकांना केली होती. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसैनिकांनी तयारीला लागण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिले. यानंतर आता राज ठाकरे नागपुरात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने सर्वच पक्षातील नेते हे संध्या नागपुरात आहेत. तर आज मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील नागपुरात दाखल होणार असल्याने या दौऱ्याला महत्त्व आले आहे. या दौऱ्यात राज ठाकरे कोणाची भेट घेणार का? याबाबतची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदांरासह बंड केल्यापासून राज ठाकरेंसोबत जवळीक वाढवली आहे. तर भाजप नेतेही राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात चर्चा करत आहेत. सप्टेंबर महिन्यात राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तर एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यामुळे आता या दौऱ्यात कोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

    राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात दौरे करत आहेत. यातच त्यांनी सप्टेंबर महिन्यात नागपुरात जात 5 जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा घेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर पक्षबांदणीसाठी राज ठाकरेंचा दौरा असल्याचेही बोलले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.