अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात गावठी हात भट्टी दारू बनवीत असल्याची माहिती अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्त्काळ धाड टाकीत कार्यवाही केली आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील अवैध धंद्यावाल्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शहरातील बहादरपुर रोड कंजरवाडा परीसरात बिंदीया लालसिंग कंजर हिच्या गैरकायदा गावठी हात भट्टीची दारू सुरु असल्याची माहिती अमळनेर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वता समक्ष व त्यांच्या पथकाने धाड टाकुन कार्यवाही केली आहे. या कारवाईत ५०००/- रि.कि.चे ४०० लि.गा.ह.भ.ची दारु तयार करण्यास उपयुक्त असे गुळ नवसागर मिश्रीत कच्चे रसायन २०० लि.मापाचे ०२ वेगवेगळ्या प्लॉस्टीक कॅनमध्ये, ५००/- रु. कि.ची १० लिटर गा.ह.भ.ची तयार दारु असा एकुण ५ हजार ५०० रुपयांचा माल सापडला आहे. हा सर्व माल तिथेच नाश करण्यात आला आहे.
या प्रकरणी मपोकों.नम्रता जरे यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन बिंदीया लालसिंग कंजर रा.बहादरपुर रोड, कंजर वाडा, अमळनेर हिच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामगिरीकरीता पो.नि.विजय शिंदे याचे पथकात पोउनि गंभीर शिंदे, पोहेका.चंद्रकांत पाटील, पोना.दिपक माळी, पोना.रविंद्र पाटील व मपोकाँ.नम्रता जरे यांचे सहकार्य लाभले.