Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात नवीन बसस्थानकाजवळ धावत्या चारचाकीने घेतला पेट !
    क्राईम

    जळगावात नवीन बसस्थानकाजवळ धावत्या चारचाकीने घेतला पेट !

    editor deskBy editor deskDecember 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील गांधी उद्यानाजवळ दि २१ रोजी बुधवारी दुपारी धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत गाडीचे इंजिन जळाले असून सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    शिरसोली येथील बद्रिनाथ जगन्नाथ पाटील हे मित्राची कार (एमएच.०५. एजे. ०६४६) घेऊन बुधवारी जळगावात बँकेच्या काही कामानिमित्त आले होते. दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास काम आटोपून ते शिरसोलीकडे निघाले होते. गांधी उद्यानाजवळून जात असताना अचानक त्यांच्या कारने पेट घेतला. पाटील यांनी लागलीच कारच्या बाहेर धाव घेतली आणि इतर नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांतच मनपाचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाचारण केले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र आगीत इंजिन जळाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.