जळगाव – महापालिकेची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त देविदास पवार होते. विषयपत्रीकेवरील प्रस्ताव सुरू करण्यापूर्वीच उपमहापौरांवर ठेकेदाराना कामे न करू देण्याबाबतचा आरोप त्याच्यावर करत महासभेच गदारोळ झाला.
भाजपच्या नगरसेविका ऍड. शुचिता हाडा यांनी आरोप करत शिवसेनेचे उपमहापौरांनी प्रभु श्रीरामचंद्र यांचा उपमहापौरांनी अपमान केला असून रामा पेक्षा रावण त्यांना श्रेष्ठ वाटत आहे. त्यांना त्यांच्या पदावर बसण्याचा अधिकार नसून त्यांनी त्या खुर्चीवर व व्यासपीठावर बसू नये, शिवसेनेचे इतर सदस्य त्यांना पाठराखण करत आहे असे आरोप केले. तसेच उपमहापौर यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली.
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला
प्रभु श्रीरामचंद्र यांचा अपमान करण्याचा कोणताही उद्दीष्ट माझ्या वक्तव्यातून मी केला नव्हता, उलट रावणाची अहंकारबाबत मी बोलत होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून भाजपकडून केला जात होता. उलट महासभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारकांच्या कामाला मंजूरी मिळणार होती ते यांना होवू द्यायची नव्हती म्हणून त्यांनी हा गोंधळ घातला असे उपमहापौर कुलभूषण पाटील माध्यमांना प्रतिक्रिया दिली.