Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव मनपा : महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडून प्रभू श्रीराचंद्र यांचा अपमान
    जळगाव

    जळगाव मनपा : महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडून प्रभू श्रीराचंद्र यांचा अपमान

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 21, 2022Updated:December 21, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज – महापालिकेची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या आज अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त देविदास पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. महासभेच्या सुरवातीला महापौरांनी सदस्यांनी आयत्या वेळी प्रश्‍न उपस्थित करण्याच्या मांगण्यावर चार दिवसात प्रस्ताव पाठवून लगेच महासभेची तारीख निश्‍चीत करून ते प्रस्ताव त्यात घेण्याची सांगितले. विषयपत्रीकेवरील प्रस्ताव सुरू करण्यापूर्वीच उपमहापौरांवर ठेकेदाराना कामे न करू देण्याबाबतचा आरोप त्याच्यावर करत महासभेच गदारोळ झाला. गदारोळ वाढत गेल्याने महापौरांनी महासभा अनिश्‍चीत काळासाठी सभा तहकुब केली. तर भाजपचे सदस्यांनी सभागृहात थांबून सभा सुरू होण्याची वाट पाहत होेते.

    सभागृहात ऑडीओक्लिप आणि उडाली खळबळ

    उपहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर भाजपने आरोप करीत ते सत्तेचा दुरपयोग करत असून कर्मचार्‍यांवर दबाव टाकत आहे. याबाबत सदस्य मयुर कापसे यांनी थेट ऑडीओक्लिप ऐकवून सभागृहात खळबळ उडवून दिली. यावेळी मयुर कापसे यांनी महाभारतातील एक कथा सांगत ध्रुतराष्ट्राचे उदाहरण दिले.

    रावणाच्या वक्त्यांवरून उपमहापौर अडचणीत

    भाजप सदस्य व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यात वाद सुरू असतांना उपमहापौरांनी रामायणातील रावणाबद्दल बोलत रावण हा रामा पेक्षा श्रेष्ठ होता पण त्याच्या अहंकारामूळे तो नष्ट झाला असे वक्तव्य त्यांनी केले. यावरून प्रभु श्रीरामामाचा अपमान केल्याचा आरोप करीत उपमहापौरांनी त्यांनी तत्काळ व्यासपीठावरून खालती उतरावे त्यांना या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी करीत सभागृहात जोदरदार घोषणाबाजी केली.

    प्रभु श्रीरामचंद्रचा उपहापौरांनी केला अपमान

    घडलेल्या घटनांवर भाजपच्या नगरसेविका ऍड. शुचिता हाडा यांनी माध्यमांशी बोलतांना म्हणाले, की शिवसेनेचे उपमहापौरांनी प्रभु श्रीरामचंद्र यांचा उपमहापौरांनी अपमान केला आहे. त्यांना उपमहापौर पदाच्या खुर्चीवर बसण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी खालती बसावे अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.