Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ग्राम पंचायत निवडणुकीत एकतर्फी यश : १९ पैकी बाळासाहेबांची शिवसेनेचे १६ पंचायतीमध्ये भगवा !
    जळगाव

    ग्राम पंचायत निवडणुकीत एकतर्फी यश : १९ पैकी बाळासाहेबांची शिवसेनेचे १६ पंचायतीमध्ये भगवा !

    editor deskBy editor deskDecember 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव  : प्रतिनिधी

    जळगाव व धरणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. १९ पैकी २ ग्राम पंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे मंगळवारी १७ ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील १२ पैकी १० तर धरणगाव तालुक्यातील ७ अशा ६ अश्या १९ पैकी १६ ग्राम पंचायतीमधील जनतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवत, बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बाळासाहेबांची शिवसेनेचे गावकारभारी निवडून आणण्यात जवळपास १०० % यश प्राप्त करण्यास यश आले आहे.

    १९ ग्राम पंचायतीच्या निवडणुकी १६ ग्राम पंचायतीमध्ये आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरपंच विराजमान होणार आहेत. सरपंचासोबतच धरणगाव तालुक्यातील ५१ ग्रामपंचायत सदस्यांपैक्य तब्बल ४२ ग्रां.पं. सदस्य तर जळगाव तालुक्यातील ९२ पैकी ८३ ग्रा. पं. सदस्य आसे एकूण १४३ ग्रा.पं, सदस्यांपैक्य तब्बल १२५ सदस्यांनी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाठींबा दिला आहे. जळगाव ग्रामीणमधील जनतेने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर विश्वास दाखवत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण भागात शेतरस्ते, शिवरस्ते, ग्रामीण भागातील रस्त्यांची केलेली विविध विकास कामे, विविध गावांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना, गावातील अंतर्गत रस्ते या कामांच्या जोरावर जनता ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबतच असल्याचे सिध्द करून दाखवले आहे.

    जळगाव व धरणगाव तालुक्यातील या १६ ग्रामपंचायतींमध्ये भगवा !

    चंद्रकांत गणपत पाटील (जळके), कैलास सोनू जळके (विदगाव), अनिताबाई नितीन जाधव (वराड खुर्द), संदीप मच्छिंद्र चौधरी (किनोद), सतीश रघुनाथ पाटील (कुवारखेडा), नितीन सुरेश कोळी (भोलाणे), निकिता मोतीलाल सोनवणे (देऊळवाडे), कल्पना लीलाधर पाटील (घार्डी-आमोदे), सुनंदा सुनील सोनवणे (सुजदे-बिनविरोध ), ज्योती जितेंद्र पाटील (सावखेडा खुर्द-बिनविरोध ) या गावांचा समावेश आहे. तर सावखेडा खु, व सूजदे या गावाची निवडणूक आधीच बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील सर्व १२ ग्राम पंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपले वर्चस्व सिध्द केले आहे .तसेच धरणगाव तालुक्यातील मिलिंद भास्कर बोरसे (धारबिनविरोध ), अनिल महारु पाटील (कल्याणे होळ), कविता काशिनाथ पाटील (खर्डे) , गोरख श्रीराम पाटील (वाघाळूद खु.) , दगडू लहू पाथरवट (भामर्डी), व अर्चना दिनकर पाटील (बोरगाव खु.) येथे भगवा फडकला असून दरम्यान, धरणगाव तालुक्यातील उखडवाडी, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी व भादली खुर्द या गावांमध्ये अपक्षांनी बाजी मारली असली, तरी अपक्ष उमेदवारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला आपला पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    विषबाधा झाल्याने ४७ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.