Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात दगडफेक ; भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
    Uncategorized

    टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात दगडफेक ; भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 20, 2022Updated:December 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर दोन गट आमनेसामने येत त्याच्यात राडा झाला आणि वाद वाढत तुफान दगडफेक झाली. यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. 

    जळगाव जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. राज्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळविला आहे. यात जामनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्‍व राहिले आहे. जामनेर तालुक्‍यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश करताच त्यांच्‍यावर पराभुत झालेल्या विरोधकांकडुन तुफान दगडफेक केली. पोलीसांनी संशयीतांची धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामधे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यामुळे गावात दंगलीसारखी परिस्‍थती निर्माण झाली होती.

    कार्यकर्त्याचा मृत्यू

    टाकळी ग्रामपचायतीच्‍या निकालानंतर दोन गट भिडले असून काही जणांनी दगडफेक केली. या दगडफेकीत धनराज श्रीराम माळी (वय ३२) या भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्‍याची माहिती आहे. घटनेनंतर जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी व प्रचंड आक्रोश केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026

    प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड; भाजपाच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी

    January 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.