लाईव्ह महाराष्ट्र : धरणगाव तालुक्यातील चमगाव गावातील रहिवाश्यांना घरासमोर डबके निर्माण झाले असून यामुळे पाणी साचत असून डासांचा त्रास वाढला आहे यामुळे डेंगू रोगाची साथ पसरू शकतो गावातील रहिवाशांनी तुंबलेल्या पाण्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. तरी प्रशासनाने याकडे लक्षद्यावे अशी मागणी होत आहे
चामगाव परिसरात राहत असलेल्या नागरिकांना घरासमोरपाणी तुंबले असून त्यात पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्यास वाव मिळत आहे. सध्या या साचलेल्या पाण्यामुळे डेंगू व मलेरिया यांसारख्या आजारांची वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली आहे. नुकतीच कोरोना महामारी संपली असून त्यानंतर लगेचच सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून त्यातून आजारांची उत्पत्ती होत आहे. परिणामी चामगाव परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. साचलेल्या पाण्याची तसेच भूअंतर्गत गटारींची गावातील नागरिकांनी मागणी केली आहे. ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष या परिसरातकधी ही पाहणी केलेली नाही.
यासंदर्भात ग्रामसेवक यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.