पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय महिलेचा विनयभंग एका ४० वर्षीय इसमाने केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय महिला नातेवाईकाच्या लग्नात जेवणासाठी जात असतांना एका ४० वर्षीय संशयित आरोपी शांताराम नागो पाटील याने दि १८ रोजी दुपारच्या सुमारास महिलेचा हात पकडीत जमिनीवर पाडीत दारूच्या नशेत शिवीगाळ केल्या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना प्रवीण पाटील हे करीत आहेत.