लाईव्ह महाराष्ट्र : दोन तरुण गावठी पिस्तुले जिवंत कारतूस सह फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता दोन्ही आरोपींना मुद्देमालासह धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथून अटक करण्यात आली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली की हे दोन तरुण गावठी पिस्तूल व जिवंत कारतूस घेऊन फिरत आहे या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेकडील सफौ अनिल जगन्नाथ जाधव, पोहकॉ अशरफ शेख निजामोददीन, पोकॉ दिपककुमार फुलचंद शिंदे, वाहन चालक पोहेकॉ विजय गिरधर चौधरी यांनी बांभोरी गावांत जाऊन सागर देवीदास सोनवणे, भास्कर अशोक नन्नवरे दोन्ही (रा. बांभोरी ता धरणगांव) याची माहिती काढण्यास सुरुवात केली असतं दोन्ही आरोपी आव्हाने गावात असल्याची माहिती मिळाली त्याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले.आरोपी सागर देवीदास सोनवणे याची अंगझडतीत २५ हजार रुपये किमतीची सिल्वर रंगाची गावठी कटटा [पिस्टल] व ०२ काडतुस मिळून आले तर भास्कर अशोक नन्नवरे दोन्ही याचे पॅन्टच्या खिशात ३हजार७५० रुपये किमतीचे ६ काडतुस मिळुन आले त्याच्या कडील पल्सर मोटार सायकल क्र.एमएच १९- डीएम ४४४१ जप्त करण्यात आली आहे याच्या विरुध पोकॉ/३०३४ दिपककुमार शिंदे यांच्या तक्रार वरुन जळगांव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवीण्यात आला