• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजित पवारांनी शिंदेंच्या मंत्री मंडळाचा घेतला समाचार !

editor desk by editor desk
December 19, 2022
in राजकारण, राज्य
0
अजित पवारांनी शिंदेंच्या मंत्री मंडळाचा घेतला समाचार !

नागपूर : वृत्तसंस्था 

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अख्ख्या मंत्रिमंडळालाच झापलं. मंत्र्यांकडून नवे पायंडे पाडले जात असल्याने अजित पवार संतप्त झाले होते. काही मंत्री शर्टाच्या खिशाला पक्षाची चिन्हं असलेले बिल्ले लावून विधानसभेत आले होते. त्यामुळे अजित पवार भडकले. तुम्ही मंत्री आहात. मंत्र्यांनी असे पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल, असं अजित पवार म्हणाले.

विधानसभेचं कामकाज सुरू होताच अजित पवार बोलायला उभे राहिले. त्यांनी सर्वात आधी मंत्र्याच्या शर्टाच्या खिशाला लागलेल्या पक्षाच्या चिन्हांचा मुद्दा उपस्थित करून मंत्र्यांना फटकारलं. एकनाथ शिंदे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. मंत्रीही राज्याचे मंत्री असतात. ते एखाद्या पक्षाचे मंत्री नसतात. असं असताना आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचं चिन्हं लावून सभागृहात कोणी येत नाही. पंतप्रधानही भाषण करताना चिन्हं लावून येत नाहीत. त्यामुळे नवीन पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल, असं अजित पवार म्हणाले.

त्यानंतर अजित पवार यांनी सीमाप्रश्नावरून सरकारला घेरलं. सीमा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली होती. काही गावं कर्नाटकात जाण्याचा ठराव करत आहेत. सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे. बैठकीत जे घडलं ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहे. त्याची माहिती त्यांनी सार्वजनिक करावी, असं ते म्हणाले. 6 डिसेंबरला चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे कर्नाटकाला जाणार होते. पण महापरिनिर्वाण दिनामुळे गेले नाही. नंतर ठरलं कुणीच कोणत्याही राज्यातील नेत्यांना कुठेही जाण्यास बंदी करायची नाही. पण लोकसभेच्या एका खासदाराला कर्नाटकाला जाण्यास मनाई करण्यात आली. स्वत: अमित शाह यांच्यासमोर कुणाला अडवणार नाही असं ठरलेलं असताना जिल्हाधिकारी अशा प्रकारची बंदी कशी आणू शकतो? असा सवाल त्यांनी केला.कोर्टात निकाल लागायचा तो लागेल. पण अशा प्रकारची दडपशाही खपवून घेता कामा नये. कर्नाटकाच्या कुरापती सुरूच आहेत. त्या रोखल्या पाहिजे, असं अजितदादा म्हणाले. अजितदादांचं भाषण सुरू असतानाच त्यांना मध्येच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रोखलं.

Previous Post

OYO च्या रुममध्ये पुण्यातील प्रेमीयुगुलांनी केला प्रवेश आणि बसला जबर धक्का !

Next Post

देशातील विद्यापिठात नोकरी पाहिजे ; या ठिकाणी करा अर्ज !

Next Post
देशातील विद्यापिठात नोकरी पाहिजे ; या ठिकाणी करा अर्ज !

देशातील विद्यापिठात नोकरी पाहिजे ; या ठिकाणी करा अर्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group