Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राऊतांच्या अडचणीत होणार वाढ ; व्हिडीओ व्हायरल केला क्रांती मोर्चाचा !
    राजकारण

    राऊतांच्या अडचणीत होणार वाढ ; व्हिडीओ व्हायरल केला क्रांती मोर्चाचा !

    editor deskBy editor deskDecember 19, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला पण तो व्हिडीओ मराठा मोर्चाचा आहे. हा व्हिडिओ महामोर्चाचा नसून मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाही संजय राऊतांविरोधात आक्रमक झाला आहे. या व्हिडिओप्रकरणी आज शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले आहे.

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर नॅनो मोर्चा म्हणून टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर म्हणून संजय राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता. ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही. मात्र, या ट्विटमधील व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

    संजय राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट करताच मराठा क्रांती मोर्चाने यावर आक्षेप घेतला आहे व हा मोर्चा महाविकास आघाडीचा नसून मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचे म्हटले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम म्हणाले की, संजय राऊत यांनी मराठा समाजाची माफी मागायला हवी. अन्यथा तुमच तोंड काळ केल्याशिवाय मराठा तरुण शांत बसणार नाही. तसेच, याप्रकरणी आज शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे तक्रार देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांना लक्ष्य करत या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.

    जरूर चौकशी करा – संजय राऊत
    संजय राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओची चौकशी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हणताच संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. संजय राऊत म्हणाले, मराठा मोर्चा ही सुद्धा महाराष्ट्राची ताकत होती आणि आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती. याची सरकारने चौकशी करावी. आपल्या चोर कंपनीला क्लीन टिच देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.