Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील लग्नाच्या हॉटेलमधून सोने चांदीचे दागिने चोरी !
    क्राईम

    जळगावातील लग्नाच्या हॉटेलमधून सोने चांदीचे दागिने चोरी !

    editor deskBy editor deskDecember 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    चुलत भाचीच्या लग्न समारंभाला नाशिक येथून आलेल्या दीपाली चेतन विसपुते यांच्या पर्समधून दागिने व रोकड, असा एकूण ६८ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला. ही घटना बुधवार, दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेदरम्यान भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये घडली. महिलेचा भाऊ संदीप देवरे याने रविवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चोरट्याने पर्समधून ४ हजार रुपये किमतीची १ ग्रॅम वजनाची सोन्याची मोतीनथ, ७ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्स, ११ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅमचे सोन्याचे झुमके, १४ हजार रुपये किमतीच्या ४ ग्रॅमच्या सोन्याचे कानातील साखळ्या, ४ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅमचे कानातील लहान टॉप्स, १७ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅमचे सोन्याचे मोतीकुळे, ८ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅमचे सोन्याचे पॉलिश असलेले फॅन्सी कडे, ७०० रुपये किमतीचा चांदीचा शिक्का, अडीच हजार रुपयांची रोकड, असा एकूण ६८ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पुढील तपास पो.ना.मनोज येवूलकर हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.