पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांची मतदान केंद्राला भेट
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सकाळपासून सरपंच पदासाठी प्रत्येक गावात मतदान प्रक्रिया सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर चोपडा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांनी भेट देत पाहणी केली.
नेहमीप्रमाणे ग्रामीण भागातील निवडणूक ही जोरदार रंगत असते त्यातच वादविवाद टाळण्यासाठी नेहमी पोलीस प्रशासन सज्ज असते त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात होत असलेल्या ग्रामीण भागातील सरपंच पदासाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया जोरदार सुरू आहे यावेळी प्रत्येक गावातील उमेदवारांनी सरपंच पदाचे माळ गळ्यात पडण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे आज त्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.
धरणगाव तालुक्यातील प्रत्येक गावात आज सकाळ पासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर पोलीसानी चौख बंदोबस्त लागलेला आहे त्याचीच पाहणी करण्यासाठी आज सकाळपासून चोपडा विभागाचे उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांनी पाहणी करीत अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन नेहमी सज्ज असते त्याचाच आज दिवसभरात प्रत्यय येताना दिसून येत आहे