टीम लाईव्ह महाराष्ट्र: शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने ती पुन्हा सुरू करण्यासाठी व तहसीलदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आलेल्या धरणगाव तालुक्यातील मौजे पिपळे गावाचा अंध रायसिग व वृद्ध आत्या आल्यावर त्याची चौकशी केली असता गाण्याच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत आहे हे समजताच तहसीलदार यांनी गणपती समोर भक्ती गीते सादर केली . त्याला तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी पैश्यानी मदत करून त्याच बरोबर महिन्या भरचा किराणा सुद्धा देऊन सरकारी वाहनातून घरी पोहचविले
धरणगाव तालुक्यातील मौजे पिंपळे येथे एकनाथ दुर्गा रायसिंग व त्याची आत्या जनाबाई हे राहतात .एकनाथ हा 100% अंध आहे.ते दोन्ही आज धरणगाव तहसिल कार्यलयात शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याची कैफियत घेऊन आले असता त्या दोघांची प्रथम तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. एकनाथ 100 टक्के अंध असल्याचे समजले .तो आपला जीवना गाढा गाणे व ढोल वाजवून चालवितो तहसीलदार देवरे यांनी त्याला गणपती बसविलेल्या रूममध्ये भक्तिगीते म्हणण्यास सांगितले.भक्ती गीते सादर करताना त्याला त्याची आत्या जनाबाई हिने उत्तम साथ दिली. यावर आपण अंध आहे म्हणून कोणी मदत करीत आहे असे जाणवता त्यांना पोलीस निरीक्षक शँकर शेळके यांनी व उपअधीक्षक भूमी अभिलेख रमेश देवरे यांनी प्रत्येकी रु 500 ची मदत केली.तसेच एकनाथ रायसिग याला एक महिन्याचा किराणा म्हणून उदरनिर्वाह किट देण्यात आले. रायसिग याला
संगायो लाभ बंद असल्याचे माहिती झाल्याबरोबर तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी लगेचच निर्देश देऊन सदर बंद लाभ सुरू करण्यास सांगितले गणपती निमित्त दोघांना महाप्रसाद भोजन देऊन शासकीय वाहनातून घरी पिंपळे येथे सोडण्यात आले.