जळगाव प्रतिनिधी : एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणाला पोलीसांनी पाठलाग करून वाल्मिक नगरातून दुपारी अटक केली आहे. त्याच्याकडील गावठी पिस्तूल हस्तगत केली असून त्याच्या विरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे (वय-२६) रा. कांचन नगर हा तरूण वाल्मिक नगरातील बगीचाच्या परिसरात गावठी बनवटीचे पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची माहिती मिळाली. शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोहेकॉ परिष जाधव, राहूल पाटील, अमोल विसपूते, प्रमोद पाटील, शरद पाटील यांनी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी लिंबू राक्याचा वाल्मिक नगर भागातील बगीचाजवळ पाठलाग करून अटक केली. त्यांच्या ताब्यातील चार हजार किंमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.