ढालसिंगी येथील घटना ;पहूर पोलिसात गुन्हा दाखल
जामनेर : प्रतिनिधी
वीटभट्टीवर काम करणाऱ्या पती-पत्नीच्या भांडण सोडविताना वीट भट्टी मालकाने मजुराचा खून केल्याची खळबळ जनक घटना ढालशिंगी ( ता . जामनेर ) येथे घडली .याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात वीट भट्टी मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे .
लहानु चांदखा तडवी ( वय २५ ) हा तरुण त्याची पत्नी व मुलाबाळांसह तोंडापूर ते ढालसिंगी जवळील हर्षल पवार यांच्या वीट भट्टीवर काम कुटुंबासह करत होता. १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास लहानु तडवी मरून पडलेल्या अवस्थेत होता. फिर्यादी शाहरुख रशीद तडवी त्याच्या फिर्यादीवरून पहुर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हाची नोंद केली आहे.
मृतदेह लिंबाच्या झाडाजवळ आणून टाकला
पती-पत्नीचे भांडण सुरू असताना वीट भट्टी मालक हर्षल पवार याने हातातील काठीने लहानू तडवी याला मारहाण केली असल्याचे फिर्यदिला प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या मारहाणीतच लहानुचा मृत्यू झाला.त्यानंतर हर्षल ने तोंडापूर येथे लहानूला डॉक्टरांकडे नेले. मात्र लहानू मृत्यूमुखी पडला असल्याने त्याला लिंबाच्या झाडाजवळ आणून टाकले आणि झाडावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याचा दर्शवल्याचे फिर्यदिने म्हटले आहे.या घटनेमुळे तोंडापूर ढालशिंगी शिवारात खळबळ उडाली आहे .