• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पशुधन चोरटयांची टोळी पोलिसांच्या ताब्यात ; २ चारचाकी जप्त

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 16, 2022
in क्राईम, जळगाव
0

लाईव्ह महाराष्ट्र न्युज जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पशुधानाच्या चोरीत वाढ झालेली होती, त्याबाबत पोलिसात गुन्हे दाखल होती. याबाबत एलसीबीच्या पथकाने जळगावसह मालेगाव व धुळे येथील ७ जणांची टोळीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी २२ गुन्ह्यांची कबुली मिळाली असून २ स्कॉर्पिओसह मोबाईल पोलिसांनी जप्त केले होते.

जळगाव जिल्ह्यात गुरे चोरीच्या गुन्हयांत सातत्याने वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. चोरट्यांचा शोधार्थ किसनराव नजनपाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, युनूस शेख, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेका राजेश मेढे, पोहेको अशरफ शेख, पोहेकॉ संदीप सावळे, पोहेका संदीप पाटील, पोहेकॉ सुनिल दामोदर, पोहेको अकरम शेख, पोहेका महेश महाजन, पोना संतोष मायकल, पोना नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, पोना/ हेमंत पाटील, पोको ईश्वर पाटील, पोकों/ उमेश गोसावी, पोको हेमंत पाटील, पोकी/ लोकेश माळी, चापोहेको/भारत पाटील, चापोको दर्शन ढाकणे, चापोना/ अशोक पाटील, सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे तपास पथक तयार केले होते.

एलसीबी निरीक्षकांना गुप्त माहिती मिळाली की, पाळधी ता. धरणगाव येथील मोहंमद फयाज मोहमंद अयाज हा गुन्हे चोरीचा मुख्य आरोपी असून तो जळगाव शहरात अंजिठा चौफुली परिसरात त्याची महेंद्र स्कॉपीयो चारचाकी वाहन क्रमांक एमएच.१२.बीव्ही.९४१५ मध्ये दिसून आला आहे. माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांची वेगवेगळे पथक तयार करुन गुप्तबातमी प्रमाणे वाहनाचा शोध घेता एचपी पेट्रोल पंपासमोर धनराज डेकोरेटर समोर स्कॉर्पिओ उभी होती व गाडीच्या ड्रायव्हर साईटचा दरवाजा उघडून ड्रायव्हर सीटवर एक इसम बसलेला दिसून आल्याने त्यास पथकाने वाहनासह ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोहमंद फयाज मोहमंद अयाज वय २४ रा.कसाईवाडा पाळधी ता. धरणगाव, यास विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार वसीम मोहमंद अस्लम कुरेशी रा. नया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद जळगाव, नईम शेख कलीम रा. मासुमवाडी, जळगाव, जाफर गुलाब नवी रा. कसाईवाडी पाळधी ता. धरणगाव, हारुन ऊर्फ बाली शहा पुर्ण नाव माहित नाही रा. बारा फत्तर जवळ धुळे ता. जि. धुळे, अरशद पुर्ण नाव माहित नाही, बालीचा साला रा. बारा फत्तर जवळ धुळे ता.जि.धुळे, मनोज ऊर्फ मोन्या विठ्ठल पाटील रा. सुरेशदादा नगर कुसूंबा ता. जळगाव अशांनी मिळून गुरे चोरी केल्याची माहीती दिली. निरीक्षकांनी लागलीच तपास पथक पाठवुन निष्पन्न आरोपींचा शोध घेतला असता आरोपी वसीम मोहमंद अस्लम कुरेशी रानिया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद मालेगांव ह.मु. मासुमवाडी जळगाव, नईम शेख कलीम रा. मासुमवाडी, जळगाव, असे मिळून आल्याने ताब्यात घेतलेल्या आरोपीतांना विचारपुस करता त्यांनी जिल्ह्यात १८ व बाहेर ४ असे एकूण २२ ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली.

पथकाने गुन्ह्यात वापरलेली गुन्हयात स्कॉर्पीयो चारचाकी वाहन क्रमांक एमएच.१२.बीव्ही.९४१५ आणि एमएच.२०.बीसी.०७५२ एकूण किंमत १७ लाख असे हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीतांना अधीक विचारपुस केल्यास इतर गुरे चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्हयातील निष्पन्न ताब्यात घेतलेले आरोपी मोहमंद फयाज मोहमंद अयाज वय २४ रा. कसाईवाडा पाळधी ता. धरणगाव, वसीम मोहमंद अस्लम कुरेशी रा. नया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद मालेगांव हमु मासुमवाडी जळगाव, नईम शेख कलीम रा. मासुमवाडी, जळगाव, यांना रिपोर्टसह जामनेर पो.स्टे. गुरन ५२१/२०२२ भादंवि कलम ३९५ अन्वये दिनांक १५ रोजी दाखल गुन्हयाचे तपासकामी जामनेर पोलीस स्टेशनला रिपोर्टासह हजर केले आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.

Previous Post

मेहुणबारे खूनाने हादरले ; धारदार शास्त्राने प्रौढाचा खून

Next Post

धक्कादायक.. वीट भट्टीवर काम करणाऱ्या तरुणाचा मालकाने केला खून

Next Post
धक्कादायक.. वीट भट्टीवर काम करणाऱ्या तरुणाचा मालकाने केला खून

धक्कादायक.. वीट भट्टीवर काम करणाऱ्या तरुणाचा मालकाने केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

July 8, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
क्राईम

निवेदन : विनयभंग करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबित करा !

July 8, 2025
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन
क्राईम

हृदयद्रावक : १७ वर्षीय विद्यार्थिनीने घरात संपविले आयुष्य !

July 8, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

जळगावात २० वर्षीय तरुणाचा झोपेतच मृत्यू

July 8, 2025
अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल
जळगाव

बापरे : शाळेतून विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न !

July 8, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापिकासह लिपिकाने घेतली ३६ हजारांची लाच !

July 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group