जळगाव : विजय पाटील
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारल्यानंतर तृतीयपंथींना राज्यातील पोलिस भरती प्रक्रियेत अर्ज करण्याचा मार्ग खुला झाला होता. आता पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यात येणार आहे. तर यंदाच्या पोलीस भरतीत आता तृतीयपंथी देखील अर्ज भरू लागले आहे. तर जळगाव जिल्ह्यातून एका तृतीयपंथीने पोलीस भरतीचा अर्ज भरला आहे.
जिल्ह्यातील भूसावळ येथील बेबो दीदी(किन्नर) यांनी नुकतेच धुळे येथे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अर्ज केला असल्याची माहिती दिली आहे. तर त्यांचे शिक्षण राजकुवर महाविद्यालय फर्दापूर येथे कॉमर्सच्या तिसऱ्या वर्षाला आहे. ते पोलीस भरतीचा सराव नियमित भुसावळ येथील रेल्वे ग्राउंडवर करीत आहेत. तर त्यांना या सरावासाठी त्यांना इरफान शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आता होत असलेल्या पोलीस भरतीमध्ये आता त्यांचे भवितव्य उजळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगतिले आहे.