जळगाव प्रतिनिधी: शहरातील पांझरपोळ परिसरात राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश कमलाकर ठाकूर(22) हा आपल्या आई कल्पनाबाई यांच्यासह राहतो. तो एमआयडीसीतील स्टार फेब्रिकेटरमध्ये कामाला आहे. मोठा विवाहित भाऊ गोपाल हा पत्नीसह धुळे येथे राहतो. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा मुतखडाचा आजार जडला होता. काल बुधवारी १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मित्र गावाहून येत आहे त्याला भेटण्यासाठी जातो असे आईला सांगून घराबाहेर पडला होता. रात्री उशीरापर्यंत घरी आला नव्हता. सकाळी त्याचा मित्राला काशीबाई कोल्हे महाविद्यालयाजवळी झाडाला त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ संजय शेलार करीत आहे.