अमळनेर : प्रतिनिधी
अंगणात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीचा हात धरून अश्लील बोलणाऱ्या व वारंवार पाठलाग करणाऱ्या पातोंडा येथील एका तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय दिलीप बाविस्कर (पातोंडा ) हा गेल्या १५ दिवसांपासून शाळेत येता-जाताना पाठलाग करत होता. त्यामुळे ती शाळेत जात नव्हती. तसेच अजय हा दुकानावर व चक्कीवर जाताना पाठलाग करून त्रास द्यायचा. ९ रोजी अल्पवयीन मुलगी व तिच्या मामाची मुलगी अंगणात बॅडमिंटन खेळत असताना अजयने तिचा हात धरून अश्लील शब्दात तिला बोलला.
मुलीचे नातेवाईक मयत झाल्याने तिने उशिरा फिर्याद दिल्यावरून अजय बाविस्कर यांच्याविरुद्ध पोस्को कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबतचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत आहेत.