Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात कापूस भरलेल्या ट्रकचा अपघात ; १ ठार ७ जखमी !
    क्राईम

    जळगावात कापूस भरलेल्या ट्रकचा अपघात ; १ ठार ७ जखमी !

    editor deskBy editor deskDecember 16, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    कापूस भरून निघालेल्या ट्रकला समोरून येणाऱ्या वाहनाने कट मारला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील हातेड नाल्याच्या वळणावर उलटल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात राज रवींद्र भिल अहिरे (२०, रा. मुकटी, जि. धुळे) या तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील चालकासह ७ मजूर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

    धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील ट्रक (एमएच १८ एए १०८०) कापूस घेण्यासाठी गुरुवारी सकाळी मजुरांना घेऊन यावल तालुक्यात आला होता. डांभुर्णी येथे शेतकऱ्यांकडून कापूस भरल्यानंतर दुपारच्या सुमारास तो मुकटी येथे जाण्यासाठी निघाला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील फार्मसी कॉलेजजवळून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारला. यात चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक हा वळणावर असलेल्या हातेड नाल्याजवळ पलटी झाला. या अपघातात ट्रकमध्ये बसलेले मजूर गंभीर जखमी झाले, तर राज रवींद्र भिल अहिरे हा तरुण जागीच ठार झाला. ट्रकच्या केबिनसह वर बसलेले मजूर हे रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये फेकले गेले, तर काही मजूर हे थेट ट्रकखाली दाबले गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढत त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी जखमींवर उपचार सुरु आहे.

    या अपघातात प्रमोद संभाजी पाटील (४०), भरत दगडू पाटील (३२), डिगंबर दिलीप पाटील (३०), रवींद्र बारकू भिल-अहिरे (५०), जितेंद्र पवार (३५), निंबा दगडू पाटील (३६) आणि बुधा पाटील (६०, सर्व रा. मुकटी, ता. जि. धुळे) हे गंभीर जखमी झाले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.