धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका महिलेचे मुत्रपींड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल ८ लाख रुपये खर्चे येत होता त्यांनी वेळोवेळी औरंगाबाद येथील एका रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना शस्त्रक्रिया करण्याचे सांगतिले.
धरणगाव शहरातील प्रगती पाटील या महिलेचे ८ डिसेंबर रोजी हि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने त्यांनी लागलीच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ना.पाटील यांनी त्या महिलेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांची मदत फक्त दोन दिवसात मिळवून दिल्याने या महिलेचे औरंगाबाद येथील मेडीकव्हर हॉस्पीटल डॉ.सचिन सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्र क्रिया यशस्वीरित्या पार पाडली. त्यासाठी संपूर्ण 8 लाखाचा खर्च आला तर यामध्ये ना.गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी प्रयत्नानामुळे या महिलेचे आर्थिक भार कमी झाल्याने महिलेच्या परिवाराने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.
पालकमंत्री पाटलांचे मानले आभार !
यावेळी रुग्णांच्या परिवारातील धरणगाव शहरातील माऊली एक्वाचे संचालक भूपेद्र पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.