Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अर्जुनने रचला नवा इतिहास; सचिनच्या पावलावर ठेवणार पाऊल !
    क्रिंडा

    अर्जुनने रचला नवा इतिहास; सचिनच्या पावलावर ठेवणार पाऊल !

    editor deskBy editor deskDecember 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    जगात क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरने आपले नाव जसे जागतिक पातळीवर नेले तसेच कार्य आता त्याच्या मुलाने सुरु केले तर वावगे राहणार नाही, नुकतीच अर्जुन तेंडुलकरने आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफी सामन्यात शतकी खेळी रचत सचिन तेंडुलकरची मान अभिमानाने ताठ केली. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरूद्ध पहिल्या डावात 178 चेंडूत नाबाद शतकी खेळी केली. अर्जुनने देखील सचिनप्रमाणेच आपल्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यात शतकी खेळी केली. सचिनने 1988 मध्ये गुजरातविरूद्ध हा कारनामा केला होता म्हणजे बाप से बेटा सवाई असे नक्कीच म्हणावे लागेल.

    गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी निवडली. पहिल्या दिवशी राजस्थानने गोव्याचा निम्मा संघा गारद केला होता. मात्र दिवस संपत आला असताना सुयश प्रभुदेसाई आणि रणजी पदार्पण करणारा अर्जुन तेंडुलकर यांनी गोव्याचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अर्जुन तेंडुलकर 12 धावा करून नाबाद होता.
    त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभुदेसाई आणि अर्जुनने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. प्रभुदेसाईने शतक ठोकले तर अर्जुनने लंचपर्यंत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर अर्जुनने आक्रमक फलंदाजी करत 178 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अर्जुन आणि सुयशने गोव्याचा डाव 5 बाद 201 धावांपासून पुढे नेला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी रचत गोव्याला 140 षटकात 410 धावांपर्यंत पोहचवले. सुयश प्रभुदेसाई हा द्विशतकाच्या जवळ पोहचला आहे.

    अर्जुन तेंडुलकरने देखील आपल्या वडिलांप्रमाणे मुंबईमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दिची सुरूवात केली. अर्जुनने विविध वयोगटात मुंबईचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्याला रणजी संघात स्थान मिळवणे कठिण जात होते. मुंबईचा रणजी संघात प्रचंड स्पर्धा आहे.
    अर्जुनने मुंबईकडून मुश्ताक अली टी 20 स्पर्धेचे काही सामने खेळला आहे. त्याची मुंबईच्या रणजी संघात देखील निवड झाली होती. मात्र त्याला गेल्या हंगामात अंतिम 11 च्या संघात संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. अर्जुनने यंदाच्या मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीत गोव्याचे प्रतिनिधित्व केले. आता रणजी ट्रॉफीत दमदार पदार्पण करत आपली गुणवत्ता दाखवून दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धावत्या कंटेनरला बसची जबर धडक : ९ प्रवासी जखमी !

    October 29, 2025

    क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

    June 9, 2025

    भारत आता दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता !

    February 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.