जळगाव : प्रतिनिधी
रस्ता अडवून तुकारामवाडीतील तरुणाला अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
रविवारी सायंकाळी ५ वाजता आकाश ठाकूर (रा. तुकाराम वाडी) हा कासमवाडीतून जात होता. त्यावेळी पीयुष ठाकूर (२०, रा. तुकारामवाडी), कुणाल ऊर्फ दुंड्या किरण कोळी (१८, रा. कुसुंबा), रोहित ऊर्फ भाल्या उत्तम भालेराव (२३, रा. तुकारामवाडी) यांच्यासह एकाने आकाश याला थांबवून अश्लील शिवीगाळ केली व दगड मारला. याप्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलिसांनी जैनाबाद येथून पीयुष, रोहित आणि कुणाल यांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, छगन तायडे, मुकेश पाटील, सचिन पाटील आदींनी केली आहे.



