धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बाभुळगाव येथील रहिवासी असलेले गजानन पुंडलिक पाटील यांची नुकतीच संजय गांधी निराधार योजनेच्या समितीमध्ये अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र जळगाव जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी पारित केले आहे. या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यक्त्यांनी अभिनंदन केले आहे.
एकनिष्ठ कार्यकर्त्याला मिळाला सन्मान !
धरणगाव तालुक्यात गजानन पाटील हे मंत्री गुलाबराव पाटील यांचे 33 वर्षांपासून एकनिष्ठ राहून अनेक सामाजिक राजकीय कामे त्यांच्या हातून घडलेले असल्याने या कार्याचे फळ म्हणून त्यांना आज संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद मिळाले आहे. हे पद मिळाल्यावर सर्व सामान्य जनतेसाठी या पदाचा पुरेपूर कसा फायदा होईल असे काम आपल्या हातून होईल असे देखील गजानन पाटील यांनी अधोरेखित केले आहे.