जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग महाविद्यालयानजीकच्या एका टपरीजवळ सुरू असलेल्या सट्टा व जुगार अड्ड्यावर सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून दोघांकडून ५ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव-भुसावळ रोडवर असलेल्या गोदावरी इंजिनिअरिंग महाविद्यालयासमोरील एका टपरीवर सट्टा व जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने दुपारी २ जुगार अड्डयांवर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत गणेश सोनवणे (३८, रा. इंदिरानगर, खेडी) आणि चेतन लोहार (२०, रा. मेहरून) यांना जागेवरच पकडले. त्यांच्याकडून रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाइल असा एकूण ५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.