मुंबई : वृत्तसंस्था
नेहमीच आपल्या ढंगात वावरताना व विचित्र फॅशन सेन्स आणि नवनवीन फॅशनच्या अविष्कारमूळं ओळखली जाणारी उर्फी जावेद ही कधी कोणती फॅशन करेल याचा काही भरोसा नाही. उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमचं नाही तर चिकट टेप, मोबाइल फोन, सायकलची चेन बनवलेल्या फॅशनमध्ये पाहिले आहे.
आता उर्फी विरोधात मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अली काशिफ खान देशमुख या वकीलाने शुक्रवारी लेखी अर्ज जमा केला. ज्यामध्ये उर्फीवर कथितपणे अवैध आणि अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्याने रविवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्हाला दोन दिवसांपूर्वी या संदर्भात अर्ज आला होता.
आधीही लेखक चेतन भगतने उर्फीवर तरुणांना भडकावल्याचा आरोप केला आहे. यानंतर अनेक लोक उर्फीच्या समर्थनात आले, तर काही लोकांनी उर्फीच्या कपड्यांवरही टिका केली. काही दिवसांपुर्वी तिच्या एका गाण्यामूळेही तिच्या विरोधात तक्रर करण्यात आली होती. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्याबद्दल नेटकरीच नाही तर मोठे सेलिब्रिटीही ट्रोल करतात. मात्र ती उर्फी आहे. ती काही कुणाचं ऐकत नाही. ती टिका करणाऱ्यानां सडेतोड उत्तर देते. मात्र आता गुन्हा दाखलं झाल्यानंतर तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता उर्फी या समस्येला कसं तोंड देते याकडे तिच्या चाहत्यांच लक्ष लागलं आहे.