धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील चमगाव फाटा ते उखळवाडी शेत रस्त्याचे चार महिन्यापूर्वी काम केले होते. आणि या रस्त्यावर आता मोठी भेग पडून रस्त्याचे दोन भाग झाले आहे. ठेकेदाराने निकृष्ठ काम केल्याचा आरोप परिसरातील गावकऱ्यांकडून केला जात आहे.
धरणगाव तालुक्यातील चमगाव फाटा ते उखळवाडी शेत रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच महिन्या आधी करण्यात आले होते.परंतु या रस्त्याने जाणारे येणारे नागरिक आता तर या रस्त्याचे काम केले होते आणि चार महिन्यातच रस्त्याचे दोन तुकडे झाल्याचे आश्चर्य व्यक्त करत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी नेहमी बैलगाडी घेऊन जात असतात, त्यामुळे बैलांचा पाय या भेगात अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. तर दुसरी बाब म्हणजे रस्त्याच्या बाजूला या ठेकेदाराने मुरूम देखील टाकलेला नसल्याने हा रस्ता अत्यंत धोकादायक झालेला आहे. ठेकेदाराने निकृष्ट काम केले असल्याचे शेतकरी वर्गाने केला आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप शेतकरी करत आहे. राजकीय नेत्यांनी संबंधित विभागाकडून हा रस्ता पुन्हा चांगला करण्याची मागणी पण गावकऱ्यांकडून होत आहे.