मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस डबल धमाका दिवस ठरला आहे, कारण आज शरद पवार यांचा वाढदिवस आणि त्यातच अनिल देशमुख तब्बल 13 महिन्यांनी दिलासा मिळाला आहे. कथित 100 कोटी प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये गेले होते त्यानंतर जामीन की जेल असं सुनावणीदरम्यान प्रश्न असायचा. अखेर अनिल देशमुखांना जामीन मिळाला आहे. ईडीने ज्या प्रकरणात त्यांना अटक केली होती त्या प्रकरणाबद्दल जाणून घेऊयात. अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती.
काय आहे नेमकं प्रकरण?
सचिन वझेकडून गृहमंत्री अनिल देशमुख असताना दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी करण्याचे असा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्रात त्यांनी अनिल देशमुखांवर हा आरोप केला आहे. यानंतर सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर नोंदवला होता. याच आधारावर ईडीने अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली.