मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना म्हणजे ठाकरे, बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव जिथे तिच खरी शिवसेना आहे. ठाकरे गट बिट हे काही आम्ही मानत नाही, शिंदेंचा गट आपण म्हणू शकतो असे म्हणत खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर मेहरबाणी म्हणून त्यांना वेगळा गट आणि चिन्ह दिले गेले असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
यापुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीवर थाप दिली, ती शिवसेना फोडल्याबद्दल शाब्बास अशी असावी का असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. जे औरंगजेब, अफजलखानाला जमले नाही, जे आम्हाला जमले नाही, तो खंजीर तुम्ही खूपसून दाखविला असा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला लगावला आहे.
राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग कसे काम करतो, यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावनी सुरू आहे असे म्हणताना संजय राऊत यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवसेना आणि शिंदे गटात सुनावणी सुरू आहे, आम्हाला खात्री आहे, एका विशिष्ट बाजूने निकाल देण्यासाठी दबाव असला तरी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरेंची आणि महाराष्ट्राची पुण्याई वाया जाणार नाही, असे म्हणतानाच राज्यातील साडेअकरा कोटी जनता ही डोळ्यात प्राण आणून या निर्णयाकडे पाहत आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहे. गटाबद्दल निर्णय ही महाराष्ट्रातील जनताच घेईल असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणे हे सगळे ढोंग आहे. पंतप्रधानांनी केवळ बाळासाहेबांचे नाव घेतले, त्यात बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान राहिल असे कुणी वागले नाही. चौथ्या क्रमाकांवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करणारे त्या व्यासपीठावर होते. आम्हाला वाटले होते की चिंतामणराव देशमुख्यांसारखे आमचे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेेंद्र मोदींना विचारतीलकी छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यक्ति या व्यासपीठीवर असतांना आपण या व्यासपीठावर कसे बसायचे.