• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘तुझी बायको माझ्याकडे पाठवून दे’ पतीने गाठले पोलीस स्टेशन !

editor desk by editor desk
December 12, 2022
in क्राईम, राज्य
0
‘तुझी बायको माझ्याकडे पाठवून दे’ पतीने गाठले पोलीस स्टेशन !

मुंबई : वृत्तसंस्था 

सध्या देशभरात वाढत असलेली गुन्हेगारीचे जाळे आता कोणत्याही गोष्टीला न घाबरता बाहेर येत आहे. जयपूरमध्ये एक अजबच प्रकार समोर आलाय. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी बायकोचा भूतकाळ एका नवऱ्याला कळला. लग्नाआधी तब्बल 7 वर्ष आपल्या बायकोचे दुसऱ्याच तरुणाशी संबंध होते, हे पतीला कळलं. त्यानंतर पती थेट पोलीस स्थानकात गेला. पण पोलीस स्थानकात जाण्याआधी पतीला बायकोच्या प्रियकराने धमकावलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. ‘तुझी बायको माझी प्रेयसी आहे, तिला माझ्याकडे पाठवून दे’, अशी धमकी पतीला देण्यात आली होती. अखेर पत्नी आणि तिच्या प्रियकराला वैतागूत पती मुरलीपुरा येथील पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने तक्रार नोंदवली.

पोलिसांनी पीडित पतीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मुरलीपुरा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. पतीने आपल्या पत्नीविरोधातच गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 7 डिसेंबर रोजी तक्रारदार युवकाचं लग्न झालं होतं. पण लग्नाच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीने आपला भूतकाळ पतीला सांगितला. माझे गेल्या सात वर्षांपासून एका मुलासोबत प्रेमसंबंध आहे, असं पत्नीने पतीला सांगितलं. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पत्नीचा भूतकाळ ऐकून पती हादरुनच गेला. दरम्यान, याचवेळी पत्नीचा प्रियकर असलेला गगन नावाच्या मुलाने मला फोन केला आणि त्याने मला धमकीही दिली, असा आरोप तक्रारदार पतीने केलाय. तू जर तिला माझ्याजवळ पाठवलं नाही, तर मी तुझा जीव घेईन, अशी धमकी तक्रारदार तरुणाला देण्यात आली होती. इतकंच नाही तर पत्नीचा प्रियकर आमच्या घरी आला आणि त्याने माझ्या आईलाही धमकावलं, असही तक्रारीत म्हटलंय. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करेन, अशी धमकी देऊन गगन गेला असल्याचं पतीने पोलिसांना म्हटलंय. दुसरीकडे तक्रारदार पतीच्या पत्नीने तिच्या वडिलांना गगनवर आपलं प्रेम असल्याची कबुलीही दिल्याची माहिती समोर आलीय.

या संपूर्ण प्रकराला तक्रारदार तरुणाचे सासरे जबाबदार असल्याचंही बोललं जातंय. मुलीने आपल्या वडिलांना गगनसोबत असलेल्या प्रेमसंबंधांबाबत आधीच सांगितलं होतं. पण वडिलांनी तिचं जबरदस्ती दुसऱ्याच मुलाशी लग्न लावून दिलं. तक्रारदार पतीने पोलिसांत जाऊन मांडलेली भूमिकाही चर्चेत आली आहे. जर तिला आपल्या प्रियकरासोबत राहायचं असेल, तर ती जाऊ शकते, असं तक्रारदार पतीने पोलिसांना सांगितलंय. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

जळगावात मध्यरात्री रस्त्यावर गोळीबार?

Next Post

आम्ही फक्त शिवसेनेला मानतो ती म्हणजे ठाकरेंची ; संजय राऊत आक्रमक !

Next Post
आम्ही फक्त शिवसेनेला मानतो ती म्हणजे ठाकरेंची ; संजय राऊत आक्रमक !

आम्ही फक्त शिवसेनेला मानतो ती म्हणजे ठाकरेंची ; संजय राऊत आक्रमक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group