मुंबई : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर कोश्यारींनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या वक्तव्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगड, सिंदखेडराजासारख्या पवित्र स्थळांवरील प्रवासाचा दाखलाही त्यांनी दिलाय.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलंय. “महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”, असं कोश्यारी यांनी पत्रात म्हटलंय. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही! वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे!, असं पत्र कोश्यारींनी अमित शाहांना लिहिलं आहे.