जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नार्थं महाराष्ट्र नॉलेज सिटी इंजिनिअरींग कॉलेज, बांभोरी जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला असुन या मेळाव्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री अरुणभाई गुजराथी, आ. एकनाथराव खडसे जिल्हा बँकेचे चेअरमन श्री गुलाबराव देवकर, जेडीसीसी संचालक डॉ. सतिष पाटील, आ.श्री अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. श्री रविद्रभैय्या पाटील यांच्यासह प्रमुख नेते व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यात इ.१० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरींग तसेच सर्व शाखेतील पदवीधर विद्याथ्र्यांसाठी देशभरातील नामांकीत कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण (ट्रेनी) काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तरी या रोजगार मेळाव्यास इच्छुकांनी आपल्या मुळ कागदपत्रासह दिनांक १४ डिसेंबर २०२२ बुधवार रोजी सकाळी ९.३० वा. नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी इंजिनिअरींग कॉलेज येथे उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले व नार्थ महाराष्ट्र नॉलेस सिटी चे अध्यक्ष प्रा.श्री आर.व्ही.पाटील सर यांनी केले आहे.