जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्वाची मानली जाणारी जिल्हा दुध संघाची निवडणुकीचे मतदान आज झाले. या निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून सर्वच पक्षाच्या नेत्यांनी रणशिंग फुकले होते. या निवडणुकीचे शंभर टक्के मतदान झाले असून उमेदवारांची भवितव्य या मतपेट्यामध्ये बंद झालेले आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नेत्यांनी व आमदारांनी एकमेकावर आरोप – प्रत्यारोप करून जिल्ह्यातील राजकिय वातावरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीत आमचाच विजय होईल असे दोन्ही पॅनलचे नेते दावा करीत आहेत. पण मतदारानी कुणाच्या पारड्यात मतदान केले आहे हे मात्र दि. ११ रोजी सकाळी समजणार आहे.
मतपेट्याच्या सुरक्षेसाठी सुनील महाजन ठाण मांडून
जिल्हा दूध संघाची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची होत आहे. शंभर टक्के मतदान झाल्यामुळे कोण निवडून येईल हे सांगणे कठीण झालेले आहे. मात्र निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सहकार पॅनलचे तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे मतपेट्याच्या सुरक्षेसाठी खडा पहारा देत आहे.