• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : एक वर्षाच्या चिमुकल्यासमोर आई वडिलांनी सोडला जीव !

editor desk by editor desk
December 10, 2022
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक : एक वर्षाच्या चिमुकल्यासमोर आई वडिलांनी सोडला जीव !

मुंबई : वृत्तसंस्था 

अवघ्या अडीच वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकलेले दाम्पत्य बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास मोर्शी- रिद्धपूर-शिरखेड मार्गावर झालेल्या अपघातात घटनास्थळीच ठार झाले. यादरम्यान त्यांच्यासमवेत दुचाकीवर असलेला त्यांचा एक वर्षीय एकुलता एक चिमुकला बचावला. त्याच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

परतवाडा शहरालगत देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बालाजीनगरमधील छोटू उर्फ पीयूष दिगंबर वाठोडकर (३०) आणि प्रतीक्षा वाठोडकर (२५) हे पती-पत्नी एक वर्षीय श्रीयंश नामक चिमुकल्यासमवेत निंभी या गावी मित्राच्या दुचाकीने गेले होते. तेथे प्रतीक्षाच्या माहेरकडील कार्यक्रमात या दोघांनीही आपली हजेरी लावली. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी घेतल्या. सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा त्यांच्या दुचाकीला मध्येच अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात ते दोघेही घटनास्थळीच ठार झाले.
पीयूष आणि प्रतीक्षा यांचे पार्थिव घटनास्थळावरून अमरावतीला दवाखान्यात दाखल केले गेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर हे दोन्ही मृतदेह देवमाळी येथील त्यांच्या राहत्या घरी एकाच वाहनातून आणले गेले.

अंत्यविधीकरिता या दोघांचेही पार्थिव एकाच स्वर्गरथात ठेवून हिंदू स्मशानभूमीत दाखल केले गेले. तेथे या दोघांच्याही पार्थिवावर एकाच वेळी अंतिम संस्कार केले गेले. यात त्यांचा अखेरचा प्रवासही एकत्रितच झाला.आईवडिलांसमवेत अखेरचा वाढदिवस अवघ्या काही दिवसांपूर्वीच आपल्या एकुलत्या एक मुलाचा पहिला वाढदिवस पीयूष आणि प्रतीक्षा यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. हा वाढदिवस त्यांच्यासाठी अखेरचा ठरला.

Previous Post

आमीर खान करतोय या अभिनेत्रीला डेट ?

Next Post

‘उद्यापासून पोलिसांच्या सुरक्षेत नसेल’ ; मंत्री चद्रकांत पाटील

Next Post
‘उद्यापासून पोलिसांच्या सुरक्षेत नसेल’ ; मंत्री चद्रकांत पाटील

‘उद्यापासून पोलिसांच्या सुरक्षेत नसेल’ ; मंत्री चद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group